You are currently viewing मनी माय

मनी माय

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका सामाजिक कार्यकर्ती, कथाकार, निवेदिका, पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अहिराणी बोलीभाषेतील कविता*

*मनी माय*

 

साधीसुधी माय मनी
खेडूत अडाणी
मनासाठी खाये खस्ता
फिरे रानीवनी

काटाकुटाना वाटवर
चालत ती जाये
उकयत्या ऊनमा
काम करत ऱ्हाये

निंदणी कापनी
काढनीबी करस
गवतना भारा
डोकावर आनस

माय मनी माले म्हणे
खूप शिक पोरी!
सयरमान जाइसन
कर तू नवकरी!

पाटी पुस्तक लीसन
जास मी शायमा
तवा माय व्हस खूश
हासस ऱ्हास गालमा

कवयित्री
अनुपमा जाधव
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 15 =