You are currently viewing रापण रिसॉर्ट्सतर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार

रापण रिसॉर्ट्सतर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार

मालवण

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भूषण साटम यांच्या रापण रिसॉर्टस, वायरी मार्फत नारी शक्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रापण रिसॉर्टस तर्फे गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा सुविधा तिनईकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामपंचायत वायरी भूतनाथच्या उपसरपंच सौ. प्राची माणगांवकर उपस्थित होत्या. महिलांना समान दर्जा सोबतच महिला सबलीकरण यावर उपस्थित महिला मान्यवरांनी विचार मांडले. यावेळी कविता तळेकर, फॅनी फर्नाडिस, सारिका शिंदे यांनी गाणे सादर केले. तसेच डॉ. शुभांगी जोशी यांनी कविता वाचन केले. जयश्री हडकर यांनी मालवणी भाषेतून भाषण केले. या प्रसंगी लायनेस क्लबच्या अध्यक्षा वैशाली शंकरदास, डॉ. सुमेधा नाईक, आहारतज्ञ डॉ.गार्गी ओरसकर, डॉ. शुभांगी जोशी, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, सौ. स्मृती कांदळगावकर, सौ. अन्वेषा आचरेकर, काजल झाड, सौ स्नेहा जामसंडेकर, मनीषा प्रभूखानोलकर यांनीही विचार मांडले.

यावेळी माजी नगरसेविका पूजा करलकर, शिल्पा खोत, शुभांगी सुकी, प्रियांका कांदळकर, मनीषा पारकर, स्वाती पारकर, दीक्षा गावकर, राखी ढोलम, मनीषा बागवे, ऋतुजा केळुसकर, सुवर्णा बागवे, संगीता पांगे, प्राजक्ता जोशी , बिंदू माशेलकर , मीना घुर्ये, श्रद्धा सावंत, सेवानिवृत्त शिक्षिका मीना केळकर, शैलजा पारकर, पर्यावरण संतुलनासाठी काम करणाऱ्या युथ बिट्स फॉर क्लायमेट च्या संस्थापिका मेगल डिसोजा यांच्यासह उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला.

ऋतुजा केळकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा पारकर, तनुश्री साटम, सायली मयेकर आणि दीक्षा गावकर यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 3 =