You are currently viewing धार्मिक सलोखा कायम ठेवा; पोलिस निरीक्षक अरुण पवार यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

धार्मिक सलोखा कायम ठेवा; पोलिस निरीक्षक अरुण पवार यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

धार्मिक सलोखा कायम ठेवा; पोलिस निरीक्षक अरुण पवार यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

दोडामार्ग
अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद सण एकाच दिवशी येत असल्याने सण उत्सव काळात धार्मिक सलोखा कायम ठेवा असे आवाहन पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.
येथील पोलिस ठाण्यात गुरुवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या.यावर्षी अनंत चतुर्दशी व ईद ए मिलाद हे सण एकाच दिवशी आलेले असल्याने धार्मिक सलोखा कायम राखला जाईल व दोन्ही सण शांततेत पार पडतील याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.
त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात वाहतूक नियोजन कसे करावे, पार्किंग व्यवस्था, मिरवणुकांचे मार्ग, ध्वनी मर्यादा, याबाबत सविस्तर चर्चा करून उत्सव काळात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीला सहा पोलिस निरीक्षक योगेश ठाकूर,शांतता कमिटीचे इसाक खेडेकर, मायकल लोबो, ललिता भोळे, संजय गवस सेजल बांदेकर आदी सदस्य हजर होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा