You are currently viewing उद्या श्री साटम महाराजांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या शॉर्ट फिल्म स्क्रीनींगचा सोहळा

उद्या श्री साटम महाराजांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या शॉर्ट फिल्म स्क्रीनींगचा सोहळा

सावंतवाडी :

उद्या दाणोली येथील श्री साटम महाराज यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकणाऱ्या शॉर्ट फिल्मचा स्क्रीनींग सोहळा  येथील समाधी मंदिराच्या ठिकाणी होत आहे.

यावेळी सावंतवाडी संस्थांनचे राजे खेमसावंत भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखम राजे भोसले, युवरांज्ञी श्रद्धा भोसले,अ‍ॅड. शाम सावंत, जी.ए. बुवा, अण्णा केसरकर, कमलाकांत पांगम, सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्निल परब उपस्थित राहणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरद विनायक एन्टरप्राइजेसच्या माध्यमातून गुणेश गवस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा