बंद पाकिटंच वजन दुर्घटनेपेक्षा जास्त?- मनसे माजी विभाग अध्यक्ष तथा उपजिल्हा संघटक रस्ते, साधन – सुविधा व आस्थापना अभय देसाई यांचा आरोप
कळणे नुकसानग्रस्त शेतकरी अजूनही न्याय मिळणाच्या प्रतीक्षेत
दिनांक २९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३० वाजता मौजे कळणे येतील शासन प्रस्थापित मायनिंग प्रकल्पाची तटरक्षक मानव निर्मित भिंत/बंधारा कोसळून साठवण केलेली खनिज माती व प्रचंड पाण्याचा साठा लोंढा कळणे धवडकीवाडीवरील वस्ती व शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्रामध्ये घुसून घरांचे, भातशेती, फळबाग लागवड, विहिरी, शेततळी, ग्रामीण पाणी पुरवठा, नळयोजना, नदीपात्र यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेंच साग, फणस व जंगली झाडे हि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. त्याचसोबत शेत-बागायती, सुपीक जमीन ओसाड व पडीक झालेल्या आहेत. कळणे येथील या घटनेला तब्बल दोन वर्ष पूर्ण होणार असून अजूनही तेथील शेतकरी वर्ग हा न्याय मिळेल या आशेवर आहे.उपोषण आंदोलन, तिरडी आंदोलन आणि आत्मदहन सारखे प्रकार या घटनेनंतर झाले तरी आपले प्रशासन जागे होत नाही.
जिल्हाधिकारी कार्यलय मध्ये पाकिटंचा वर्षाव झाला आहे का? असा सवाल मनसे उपजिल्हा संघटक श्री.अभय पांडुरंग देसाई यांनी विचारला आहे.
मायनिंग कंपनीकडून पाकीट जिल्हाधिकाऱ्यांना तसेच खनिकार्म शाखेत पोचले असावे म्हणून आम्हाला न्याय मिळण्यासाठी आटापिटा करावा लागतो आहे.