You are currently viewing आज १६ ऑक्टोबर रोजी कुणकेश्वर येथे डबलबारी भजन सामना!

आज १६ ऑक्टोबर रोजी कुणकेश्वर येथे डबलबारी भजन सामना!

बुवा अक्षय बोरकर विरुद्ध बुवा श्री संतोष जोईल यांच्यात सामना

 

देवगड :

 

नवरात्र उत्सवानिमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिर कुणकेश्वर येथे १६ ऑक्टोबर रोजी रात्री ठीक नऊ वाजता आमने-सामने डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. कोकण रत्न बुवा संतोष शिरसेकर व बुवा श्री अभिषेक शिरसाट यांचे शिष्य बुवा अक्षय बोरकर (मुणगे- देवगड) विरुद्ध भजनसम्राट बुवा श्री श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य बुवा श्री संतोष जोईल या दोन भजनी बुवांमध्ये हा सामना रंगणार आहे. अक्षय बोरकर यांना पखवाज तुषार शिंदे, तबला सुनील बोरकर (मुणगे) आणि चकवा मनोज सावंत हे साथ करणार आहेत. तर बुवा संतोष जोईन यांना पखवाज अक्षय मेस्त्री, तबला मांगिरीश घाडी हे साथ करणार आहेत. भजन प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जोगेश्वरी मंडळ कुणकेश्वर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + eleven =