महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंधुदुर्ग दौरा….

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंधुदुर्ग दौरा….

सिंधुदुर्गनगरी 

राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दिनांक 31 ऑक्टोबर 2020 व 1 नोव्हेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

       शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सायं. 5.00 वा. कुडाळ येथे आगमन व आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदार संघातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती व मतदार संघातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत मतदार संघातील कामांबाबत आढावा बैठक, रात्री 9.00 वा. कुडाळ येथून आंबोलीकडे प्रयाण, रात्री 9.45 वा. आंबोली येथे आगमन व मुक्काम.

       रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 9.00 वा. आंबोली येथील पर्यटन स्थळ पाहणी, सकाळी 10.00 वा. आंबोली येथे जिल्हाधिकारी, नगर रचना विभाग, महाराष्ट्र पर्टयन विकास महामंडळ व संबंधित विषयांचे सर्व अधिकारी यांच्या समवेत कबुलायतदार जमिनी वाटप समिती बरोबर बैठक, सकाळी 11.00 वा. आंबोली येथून सावंतवाडीकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात आगमन व झोळंबे, ता. दोडामार्ग येथील भूस्खलन व अतिवृष्टीमुळे सुपारी बीगेच्या झालेल्या नुकसानीबाबत ग्रामस्थांसोबत चर्चा, दुपारी 12.00 वा. सावंतवाडी येथील राजवाडा येथे हस्तकला प्रदर्शन केंद्रास भेट, दुपारी 12.45 वा. जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्या समवेत नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सावंतवाडी येथील स्थळास भेट व पहाणी, दुपारी 1.00 वा. शासकीय विश्रामगृह, सागर बंगला वेंगुर्ला, येथे आगमन व राखीव, दुपारी 2.00 वा. वेंगुर्ला नगर परिषद हद्दीतील नवाबाग येथे मुख्याधिकारी, वेंगुर्ला व इतर अधिकारी, उभादांडा गावाचे सरपंच, उपसरपंच, यांच्या समवेत फिशिंग व्हिलेज प्रकल्पाबाबत चर्चा, दुपारी 2.30 वा. नवाबाग येथऊन पंचायत समिती, वेंगुर्लाच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी, दुपारी 3.00 वा. पंचायत समिती वेंगुर्ला येथून रेडी बंदराकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. रेडी बंदर येथे आगमन व पाहणी, दुपारी 4.00 वा. रेडी बंदर येथून आरोंदा ता. सावंतवाडीकडे प्रयाण, दुपारी 4.15 वा. आरोंदा, ता. सावंतवाडी येथे आगमन व तेरेखोल खाडी पाहणी, सायं. 5.00 वा. तेरेखोल येथून पणजी, गोवा कडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा