You are currently viewing ॲड.सर्जेराव साळवे यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती

ॲड.सर्जेराव साळवे यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती

*ॲड.सर्जेराव साळवे यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती*

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर या संस्थेच्या वतीने नुकताच १४वा वर्धापन दिन मुक्ताईनगर येथे साजरा करण्यात आला. या वेळी ३५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ सतिश तराळ तसेच डॉ प्रतिमा इंगोले या हजर होत्या. संस्थेचे सचिव प्रमोद पिवटे यांनी संस्थेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. त्यानंतर संस्थेतर्फे राज्य व जिल्हा स्तरावर पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून साहित्यिक, कवी ॲड सर्जेराव साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या वतीने नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात.
ॲड सर्जेराव साळवे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य,आवड व शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या उपक्रमातील सततचा सहभाग यावरून ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले. ॲड सर्जेराव साळवे हे छत्रपती संभाजी नगर येथील गणपतराव साळवे च्यारीटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अनेक कविता, लेख प्रकाशित असून अनेक साहीत्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांनी अनेक वृक्षारोपण कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कायदेविषयक जनजागृती व मोफत मार्गदर्शन या बाबतीत त्यांना अनेक संस्थांनतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी कलामंचावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून बेटी बचाव, अन्न वाचवा, वाचन चळवळ, भृणहत्या बंदी, क्यैंसर मुक्ती, व्यसन मुक्ती आदि विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले आहेत.


त्यांच्या या निवडीबाबत सर्व थरातून, मित्रमंडळी व साहित्यिक मित्रांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाला डॉ सुभाष बागल,छ.संभाजी नगर, प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके, बुलढाणा, महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, अनेक नामांकित व्यक्ती, साहित्यिक नागरिक तसेच मोठ्या संख्येने महीला वर्ग हजर होते.या वेळी ॲड साळवे यांनी भृणहत्या विषयावर “आई मला तू जगात येऊ दे, आई गं माझा जन्म होऊ दे!” मी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती ताई राणे, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख यांनी केले तर गणेश कोळी यांनी आभार मानले.

प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
9975892602

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

प्रतिक्रिया व्यक्त करा