You are currently viewing युवा फोरम भारत संघटना राबवनार ‘मिशन सिंड्रेला’ हा नविन उपक्रम….

युवा फोरम भारत संघटना राबवनार ‘मिशन सिंड्रेला’ हा नविन उपक्रम….

जिजांच्या मार्फत केली जाणार महिलांना मदत…

महाराष्ट्रात 500 महिलांना दर महिन्याला दिले जाणार सॅनिटरी नॅपकिन्स मोफत : युवा फोरम भारत संघटनेचे संस्थापक संघटना प्रमुख यशवर्धन राणे….

कुडाळ :

युवा फोरम भारत संघटना गेले काही दिवस महिलांच्या मासिक पाळी बद्दल जनजागृती करण्याचे कार्य सामाजिक माध्यमातून करीत आहेत. एवढ्यावरच न थांबत युवा फोरम मार्फत “मिशन सिन्ड्रेला” नावाचा उपक्रमात देशभरात राबवला जाणार आहे. ह्याच संदर्भाची पहिली बैठक आज घेण्यात आली ह्यावेळेस युवा फोरम भारत संघटनेच्या आरोग्य विभाग प्रमुख नेहा घाडीगावकर , उपक्रमाच्या प्रमुख ऍड. सायली चव्हाण, तसेच प्रत्येक प्रांतातून महिला सयंसेवीका उपस्थित होत्या. महाराष्ट्रातून दीक्षित परब, निधी जोशी, वैष्णवी मालणकर , सृष्टी देसाई, श्रेया पाटील, संजना चव्हाण, तसेच लखनौ मधून शिवानी तिवारी व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.

“मिशन सिंड्रेला” मार्फत केवळ जनजागृती न्हवे तर “सॅनिटरी नॅपकिन्स” चे वाटप देखील करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला 500 महिलांना दर महिन्याला हे सॅनिटरी नॅपकिन्स मोफत देणार असल्याचे युवा फोरम भारत संघटनेचे संस्थापक संघटना प्रमुख यशवर्धन राणे म्हणाले. “मिशन सिंड्रेला” मधील महिला स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना तळागाळातील ग्रामीण विभागातील महिलांना मदत करण्यास पाठवले जाईल असेहि ते म्हणाले. ह्या महिला स्वयंसेवकांना राजमाता जिजाऊंचे बळ व हिम्मत मिळावी म्हणून त्यांना जिजाऊंच्या कन्या “जिजा” असे संभोदले जाईल. ह्या उपक्रमात त्यांना सर्व नागरिकांची सहायता मिळावी अशी विनंती केली आहे. शनिवार दिनांक 10 ऑक्टोंबर 2020 रोजी ह्या उपक्रमांचा प्रारंभ पानशेत, पुणे येथे होणार आहे त्यांनतर शिरोडा व इतर ग्रामीण विभागात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =