You are currently viewing ८ मार्च रोजी पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी विविध स्पर्धा व सन्मान सोहळ्याचे आयोजन

८ मार्च रोजी पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी विविध स्पर्धा व सन्मान सोहळ्याचे आयोजन

देवगड :

 

पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण रामदास पोकळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वा.ते ९ वा या वेळेत पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पटांगण येथे महिलांसाठी विविध स्पर्धा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून १५ वा वित्त आयोगातून महिला व बालकल्याण योजने अंतर्गत बालस्नेही गाव संकल्पनेतून कन्यारत्नांच्या भविष्य निर्माण निधी योजनेतून १ लाख १० हजार कन्यारत्न पुरस्कार (३४ कन्यारत्न ना) वितरण करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा अधिकारी स्वाती देसाई, पडेल मंडळ अधिकारी रेश्मा कडुलकर, डॉ. अर्चना किरण मराठे (देवगड) ल.डॉ. पूजा मालपेकर (पडेल), आदी उपस्थित राहणार आहेत. पडेल गावातील विविध क्षेत्रातील महिला उद्योजक डॉक्टर, वकील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, नर्स, पडेल महिला माजी सरपंच / उपसरपंच आदींचा सन्मान करण्यात येणार आहे. ३ ते ९ शालेय विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा,बक्षिसे व प्रशस्ती पत्र, महिलांसाठी होम मिनिस्टर-पैठणी व इतर बक्षिसे व प्रशस्ती पत्र, पाककला स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र, मुलींसाठी रस्सी खेच स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र, सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पडेल गावातील सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पडेल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा