You are currently viewing “छत्रपतींवर” आधारीत महानाट्याने होणार माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा…

“छत्रपतींवर” आधारीत महानाट्याने होणार माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा…

संजू परब व विशाल परब यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहीती…

कुडाळ

माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशन सिंधुदुर्ग व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्चला कोकण पर्यटन महोत्सह 2023 चे आयोजन करण्यात आले असून यात आशिया खंडातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराज्यावर आधारीत “शिवगर्जना” हे महानाट्य होणार आहे. कुडाळ नवीन बस स्टँड समोर सायंकाळी पच वाजता हे महानाट्य होणार असल्याची माहीती भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संजू परब व विशाल फाऊंडेशनचे सर्वेसर्वा उद्योजक विशाल परब यांनी संयुक्त परिषदेत दिली.जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा याला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहे.

श्री विशाल परब म्हणाले, गेली कित्येक वर्ष विविध कार्यक्रम आयोजित करत आला आहे, यावर्षी महानाट्य ठेवण्यात आले आहे. कुडाळ नवीन बस स्टँड येथे पाच वाजता या कार्यक्रमाचा नारळ फोडणार आहे, सिधुदुर्ग व राज्याचे आयडाॅल माजी खासदार निलेश राणे हे आमचे राजकीय गुरु आहे, त्याच्या माध्यमातून माझ्यासारखे अनेक चेहरे उजेडात आले. त्यामुळे छत्रपतींच्या जीनगाथा नवीन पिढीला ज्ञात व्हावी हा या मागचा उद्देश आहे, या महानाट्यात बाहेरील कलाकारांसोबत स्थानिकांनाही कला सादर करण्याची संधी देण्यात येण्यात आहे, मात्र दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे सिलेक्शन होणार आहे.जवळपास सातशे कलाकार या नाटकात आहेत. या महानाट्यत हत्ती घोडे असे प्राणी असणार आहे. या महानाट्याला नेते उपस्थित राहणार असून. आठही तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थाना मोफत पास देण्यात येणार आहे.

या महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्निल यादव म्हणाले, हे महानाट्याचे शो हिंदीत दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात होणार आहे, हत्ती घोडे, उंट असे प्राणी असणार आहे, तर भव्यदिव्य असा रंगमंच उभारण्यात येणार आहे, यावेळी महाराष्ट्रातील लोककलेच सादरीकरण होणार असून शिवराज्याभिषेक दरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.

यावेळी दादा साईल,अशोक सावंत महानाट्याचे दिग्दर्शक, स्वप्निल यादव सह दिग्दर्क शकिल पटेल, दिग्विजय कालेलकर,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =