You are currently viewing महामार्गावर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करा

महामार्गावर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करा

माजी खासदार व शिवसेनेचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याजवळ केली मागणी

कुडाळ

मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे महामार्गाला लागून वाहने दिवसभर उभी केली जातात. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. धोकादायक परिस्थिती उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहनांवर कारवाई व्हावी अशी मागणी माजी खासदार व शिवसेनेचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याजवळ केली आहे.

पावशी येथे महामार्गाला लागून त्या ठिकाणचा रहिवाशी आपल्या ताब्यातील टेम्पो उभा करून ठेवतात. या टेम्पोमुळे विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना महामार्गावर जावे लागते. त्याचा त्रास सहन करावा लागतो. भविष्यात टेम्पोमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टेम्पो या ठिकाणाहून काढावा. तसेच योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पोलीस अधीक्षक यांच्याजवळ केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा