आज झालेल्या प्राथमिक बैठकीत निर्णय; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती
सावंतवाडी
शासनाचा परिपत्रक असल्याने आम्ही कर वाढ केल्याची मुख्याधिकारी यांनी सांगितलं. परंतु मुख्याधिकारी हे खोटे बोलत आहेत. नगरपालिका जरी ही छोटी असली तरी ही गव्हर्मेंट आहे. याचे सर्व अधिकार हे कौन्सिलला आहे. त्याना दर ठरवण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय दर ठरवता येत नसल्याचं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. त्यामुळे कर वाढ रद्द करण्यासाठी उद्या संध्याकाळी केशवसुत कट्टा येथे बैठक बोलून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशी माहिती साळगावकर यांनी यावेळी दिली. श्री साळगावकर यांनी आज महाविकास आघाडी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत आपल्या कार्यालयात बैठक घेतली.
साळगावकर पुढे म्हणाली केशवसुत कट्टा येथे कर रद्द करण्यासंदर्भात उद्या केशवसुत कट्टा येथे जाहीर सभेत सर्वांनी आपली भूमिका मांडायची आहे. तसेच येताना पदाधिकाऱ्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान बैठकीमध्ये आंदोलना बाबत चर्चा करून घागर मोर्चा, घंटानाद करायचा या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करण्यासंदर्भात देखील या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान याबाबत समिती स्थापन करून या समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या दोन दोन व्यक्तींना सहभाग करून घेण्यात येणार आहे. तसेच आंदोलन करायचे की नाही यासंदर्भात देखील उद्या त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे साळवकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेना जेष्ठ नेते अण्णा केसरकर, मनसे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, काँग्रस शहराध्यक्ष राजेंद्र नार्वेकर, शहराध्यक्ष देवा टेंमकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, काँग्रेस उप तालुध्यक्ष समीर वंजारी, चंद्रकांत कासार, सुरेश भोगटे, उमाकांत वारंग, शैलेश गवंडळकर, इफतिकार राजगुरू, राकेश नेवगी, बावतीस फर्नांडिस, समीरा खलील आदी उपस्थित होते.