You are currently viewing माडखोल येथील रबर बागेत काम करणारा कामगार बेपत्ता…

माडखोल येथील रबर बागेत काम करणारा कामगार बेपत्ता…

सावंतवाडी

माडखोल येथे रबर बागेत कामाला असलेला तामिळनाडू येथील परप्रांतीय कामगार बेपत्ता झाल्याची नोंद येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जोसेफ जगन्न लासन असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद बाबू कन्नन के (वय ५०) या बागेच्या मॅनेजरने दिली आहे. त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली आहे. जोसेफ जगन्न लासन हा माडखोल येथे रबर बाग असलेल्या बिजू वडक्कन याच्या बागेत काम करीत होता. १५ तारखेला तो आपण तामिळनाडू येथे गावी जातो, असे सांगून तो निघून गेला. मात्र २५ तारखे पर्यंत गावी पोहोचला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने अन्य एका सहकार्‍याला संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर त्याचा शोधाशोध केल्यानंतर सुध्दा तो मिळून आला नाही. तसेच त्याच्याकडे असलेला मोबाईल बंद स्थितीत आहे, असे त्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार बेपत्ताची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत, असे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा