You are currently viewing महाराष्ट्र कँश्यू मनुफँक्चरर्स असोसिएशनची झाराप येथे उद्या सभा

महाराष्ट्र कँश्यू मनुफँक्चरर्स असोसिएशनची झाराप येथे उद्या सभा

वेंगुर्ले

महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन ची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 5 मार्च रोजी झाराप,नेमळे ब्रीज जवळील “हॉटेल आराध्य” (कुडाळ) येथे आयोजित केलेली आहे.
या सभेमध्ये काजू उद्योगाला आवश्यक असणारे वेगवेगळ्या मशीनरी चे 26 स्टॉल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यासभेस महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनच्या व्यासपीठावर कर्नाटक कॅश्यु असोसिएशनचे आजी-माजी 4 अध्यक्ष, गोवा कॅश्यू असोसिएशन अध्यक्ष ,ओरिसा कॅश्यू असोसिएशन अध्यक्ष असे हे सर्व महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष समवेत उपस्थित राहणार आहेत. या सर्वात मोठ्या संधीचा फायदा सदरचे प्रदर्शन हे महाराष्ट्रातील काजू उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व काजू उद्योजकांच्या ज्ञानात भर पडणार आहे. ही संधी न गमावता आपल्यासोबत नवीन उद्योगांना असोसिएशन सभासद करून घेणार आहे. सर्वांनी सभासद वाढविण्यासाठीची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील काजू संघटना मजबूत होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन महाराष्ट्र कँश्यू मँनुफँचरर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
*माजी खासदार निलेश राणेंचे महाराष्ट्र कँश्यू असोसिएशन तर्फे मानले आभार*
माजी खासदार निलेश राणे यांनी काजू उद्योगाच्या थकित कर्जाच्या पुनर्ररचनेबाबत व काजू उत्पादकांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य शासनाकडे तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. काजू प्रक्रिया उद्योग हा कोकणातील अर्थव्यवस्थेचा आणि रोजागार निर्माण करणारा उद्योग असल्याने कोरोना काळात तो संकटात सापडला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मlस्य व्यवसाय विभागाने शासन निर्णय काढून राणे यांनी केलेल्या विविध शिफारशींवर कार्यवाही करण्याबाबत अध्यादेश जारी केला होता. यावर शासनाकडून झालेल्या कार्यवाहिमुळे काजू उद्योग व उत्पादकांना म्याय मिळाला आहै। यास्तव त्यांचे महाराष्ट्र कँश्यू असोसिएशनने आभार मानण्यात केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − three =