You are currently viewing वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लास रूम, वेबसाईट सुरू

वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लास रूम, वेबसाईट सुरू

प्रशासक प्रजीत नायर यांनी केला शुभारंभ

वैभववाडी

वैभववाडी पंचायत समितीच्या व्हर्च्युअल क्लास रूम व वेबसाईटचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते पार पाडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महिला बालकल्याण जिल्हा अधिकारी श्रीमती काकडे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पंचायत समिती वैभववाडी या ठिकाणी गुरुवारी सत्यनारायण महापूजा पार पडली. या निमित्त विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमालाही प्रजित नायर यांनी हजेरी लावली. रांगोळी स्पर्धा, फणीगेम्स स्पर्धा, पाककला स्पर्धा आदी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना श्री नायर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दरम्यान शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचा शुभारंभ ही नायर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नायर म्हणाले, प्रशासनात काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी हे एका कुटुंबातील सदस्य आहेत. या कुटुंबात येऊन खूप आनंद झाला. ग्रामीण भागात काम करत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेता आल्या. त्या सर्व अडचणी मार्गी लावणार असे नायर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा