You are currently viewing ४ मार्च रोजी सावंतवाडी माठेवाड्यातील श्री.काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्रात होणार सत्संग आनंद सोहळा!

४ मार्च रोजी सावंतवाडी माठेवाड्यातील श्री.काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्रात होणार सत्संग आनंद सोहळा!

सावंतवाडी :

 

शनिवार दिनांक ४ मार्च २०२३ रोजी माठेवाडा येथील श्री.काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्र येथे श्री क्षेत्र कणेरी मठ कोल्हापूर संस्थानचे मठाधिपती श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचा सत्संग आनंद सोहळा पार पडणार आहे. “संत येती घरा तोचि दिवाळी दसरा” अशा या सुवर्ण क्षणी आदरणीय गुरुबंधू भगिनीं, भाविकांनी या सत्संग आनंद सोहळ्याला उपस्थित राहून सद्गुरुंचे अमृत वचन आत्मज्ञात करण्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी श्री.काडसिद्धेश्वर मठाचे अध्यक्ष श्री.परशुराम पटेकर आणि सदस्यांनी यांनी केले आहे.

शनिवार दिनांक ४ मार्च २०२३ रोजी श्री.काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्र सावंतवाडी येथे सकाळी ५.३० वा. काकड आरती, ९.०० वा. सकाळचे सांप्रदायिक भजन, ११ वा. दुपारचे सांप्रदायिक भजन, सायं. ५.०० वा. दिंडीच्या गजरात श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आगमन व पाद्यपूजा, ६.०० वा. रात्रीचे सांप्रदायिक भजन, ७.०० वा. दासबोध वाचन, ८.०० वा. सद्गुरु श्री.अदृश्यस्वामींच्या अमृत वाणीतून आध्यात्मिक प्रवचन, रात्रौ ९.०० वा. आरती, दर्शन व महाप्रसाद असा कार्यक्रम पार पडणार आहे.

तरी भाविकांनी श्री.स्वामी दर्शन आणि प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 5 =