मसुरे :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात मोठ्या गटातील ज्ञानी मी होणार या स्पर्धेमध्ये श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर केंद्रशाळा मसुरे नं.१ या शाळेतील कु. श्रेया प्रदीप मगर व कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
शालेय अभ्यासक्रम, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यावर आधारित असणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना घवघवीत यश मिळविले. त्यांना सौ. रामेश्वरी मगर, गोपाळ गावडे, शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, विनोद सातार्डेकर, उमेश खराबी यांनी मार्गदर्शन केले. विजेतेपदाच्या करंडकासह सुवर्ण पदक, प्रशस्तिपत्र देऊन शिक्षणाधिकारी श्री. महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी श्री. शोभराज शेर्लेकर, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, विस्तार अधिकारी सौ. परब, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख यांनी त्यांचा गौरव केला.
यासोबतच जिल्हास्तरावर सादर झालेल्या समूहगीताने व विद्यार्थी वाद्यवृंदांनीही सर्वांची मने जिंकली. या यशाबद्दल माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी जी प सदस्य सरोज परब, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, छोटू ठाकूर, उद्योजक दीपक परब, उद्योजक दीपक सावंत, महाराष्ट्र कॅरम सोसिएशनचे उपाध्यक्ष बाळा गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सन्मेश मसुरेकर, सरपंच श्री. संदीप हडकर, माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. शिवराज सावंत, पंढरीनाथ मसुरकर, उपसरपंच राजेश गावकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शितल मसुरकर, महेश बागवे, विलास मेस्त्री, शिरीष प्रभुगावकर, ज्योती पेडणेकर, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक, माजी विदयार्थि यांनी अभिनंदन केले आहे.