You are currently viewing वैद्यकिय अधिकारी नसल्याने कळसुली प्रा.आरोग्य केंद्रात आरोग्य यंत्रणा कोलमडली

वैद्यकिय अधिकारी नसल्याने कळसुली प्रा.आरोग्य केंद्रात आरोग्य यंत्रणा कोलमडली

वैद्यकिय अधिकारी म्हणून डॉ. मिठारी द्या; राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रूजाय फर्नांडीस यांची मागणी

 

कणकवली :

कणकवलीत कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. पोळ यांची काही दिवसापूर्वी बदली झाली असल्यामुळे वैद्यकिय अधिकारी पद रिक्त असल्याने साहजिकच 16 महसुली गावांतील नागरिकांना साहजिकच फटका डॉक्टर नसल्या अभावी बसत आहे. कळसुली गावातली आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याने कळसुली प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ.कुबेर मिठारी यांची पुनः कळसुली प्रा. आरोग्य केंद्रात नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रुजाय फर्नांडिस यांनी केली आहे.

डॉ. कुबेर मिठारी यांनी गेली अनेक वर्षे कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवस – रात्र काम करुन गावातली नागरीकांना चांगल्या प्रकारे सेवा दिली, असल्याने कोलमडून गेलेली आरोग्य यंत्रणा सुस्थितीत करण्यासाठीं डॉ. कुबेर मिठारी हवेत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली असल्याचे श्री. रूजाय फर्नांडीस यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + fourteen =