You are currently viewing देवगड पोलिसांनी बुडणाऱ्या खलाशाला वाचविले…

देवगड पोलिसांनी बुडणाऱ्या खलाशाला वाचविले…

आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम

देवगड

देवगड जेटी नजीकच्या समुद्रामध्ये बोटीवरील एक खलाशी पाण्यात पडून बुडत असल्याची माहिती फोन द्वारे मिळाल्यानंतर तात्काळ देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, सहा.पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जोशी, पोलीस हवालदार अमित हळदणकर, पोलीस शिपाई विशाल वैजल, गणेश चव्हाण निलेश पाटील महिला पोलीस नाईक प्राजक्ता कविटकर व होमगार्ड मंगेश जाधव व त्यांचे पथक असे तत्काळ ” शितल” या मत्स्यविभागाच्या बोटीतून घटनास्थळी जाऊन समुद्राच्या पाण्यात बुडत असलेल्या खलाशाचा उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे जीव वाचवण्यात यश आलेले आहे. सदर आपत्कालीन व्यवस्थापनाची रंगीत तालीम १२ वा. ते १.४०वा. या वेळेत राबविण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा