सडूरे येथे रास्त दराच्या धान्य दुकानाचे तहसीलदार रामदास झळके यांच्या शुभहस्ते उद्घाटन

सडूरे येथे रास्त दराच्या धान्य दुकानाचे तहसीलदार रामदास झळके यांच्या शुभहस्ते उद्घाटन

तळेरे

वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावाचे रेशन दुकान गावाबाहेर होते.शासनाचे परिपत्रक यायची पण सदर बाबतीत पाठपुरावा नसल्यामुळे गेले पाच ते सहा वर्ष सदर दुकान गावांमध्ये येऊ शकलं नाही. या पार्श्वभूमीवर ती ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी सदर बाबतचा पाठपुरावा करून यश प्राप्त केले. हे रेशन दुकान मंजुरी साठी वैभववाडी तालुका भाजपा अध्यक्ष नाशिर काजी,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे युवा चिटणीस हेमंत रावराणे, ग्रामसेवक प्रशांत जाधव, माजी उपसरपंच वैशाली सावंत, दीक्षा रावराणे, मालती रावराणे, जय भवानी महिला बचत गट सडूरे चे सर्व पदाधिकारी व सडूरे गावातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला व सदर राशन दुकान मंजुरी करण्यासाठी सहकार्य केलं. महसूल विभागासह पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी गावचे कोतवाल तलाठी यांचे महत्वपूर्ण सहकार्य या रेशन दुकानाच्या या मंजुरीसाठी लाभले. यावेळी बोलत असताना तहसीलदार झळके यांनी दुकान कसे चालवावे व पारदर्शक काम कसे करावे याबाबत सूचना देत दुकान चालक यांना व नवीन दुकान चालू झाल्याबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी सर्व सहकार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी,अधिकारी वर्गाचे ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज काळे यांनी आभार मानले. कर्यमाचे आभार पर मनोगत दिक्षा रावराणे केले.
यावेळी उपस्थित वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार रामदास झळके, पुरवठा अधिकारी श्री संभाजी खाडे, श्री रामेश्वर दांडगे, महसूल विभागाचे अधिकारी श्री कैलास पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ प्रियांका बंडगर,माजी उपसरपंच वैशाली सावंत, माजी प्रभारी सरपंच सत्यवान डांगे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोविंद भोसले गुरुजी,माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते डी के सुतार, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय जंगम,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे,तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चव्हाण, निम अरुळे गावच्या सरपंच सविता कदम ,बबन रावराणे,सत्यवान रावराणे,बौद्ध विकास मंडळ सडुरे बौद्धवाडी अध्यक्ष महेंद्र जंगम,दत्ताराम रावराणे, जय भवानी महिला बचत गट अध्यक्षा दीक्षा रावराणे, मालती रावराणे, केशव राऊत, श्रीकांत उर्फ बाळा रावराणे,रघुनाथ चव्हाण, राऊत महाराज, बौद्ध विकास मंडळ सडुरे बौद्धवाडी अध्यक्ष महेंद्र जंगम, गावचे कोतवाल मोहन जंगम,मधुकर सावंत, सुरेखा चव्हाण, मंगेश चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी कोरोना नियमाचे पालन करण्यात आले.


उद्घाटन करताना वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार रामदास झळके ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, पुरवठा अधिकारी संभाजी खाडे, रामेश्वर दांडगे, डॉ. प्रियांका बंडगर, बबनराव रावराणे आदी मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा