You are currently viewing रेखा शाखेतील कर्मचाऱ्यांना वेतनातील थकबाकी मिळवून देणार..

रेखा शाखेतील कर्मचाऱ्यांना वेतनातील थकबाकी मिळवून देणार..

केंद्रीय अध्यक्षांचे आवाहन; सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने कुडाळात स्वागत…

कुडाळ

वनविभागाच्या रेखा शाखेतील कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगातील त्रुटीमुळे राहिलेली वेतनाची थकबाकी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी संघटनेचे केद्रीय अध्यक्ष जा.की.जाफरी यांनी कुडाळ येथे दिले. दरम्यान १४ मार्चला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात रेखाचित्र संघटनेच्या सर्व सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

यावेळी सिंधुदुर्ग संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी सचिव प्रसाद कापडोसकर सोबत केंद्रीय सचिव सुधीर गव्हाणे, प्रमुख सल्लागार वाल्मीक दारुणकर, विभागीय सचिव प्रशांत कहाते, एम. ए. रहीम, तुकाराम कुमठेकर आदी उपस्थित होते.

यावेळी वनखात्याच्या रेखाचित्र कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत १९९६ ते २००६ या कालावधीतील वेतनाची थकबाकी मिळाली नसल्याचे रेखाचित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. हि वेतन थकबाकी फक्त कृषी विभागास मिळाली होती. महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेने याबाबत महाराष्ट्र प्राधिकरण न्यायालयात दावा दाखल करून पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व मृदू संधारण विभागातील रेखाचित्र शाखेच्या कर्मचाऱ्यांना ही ह्या वेतनाची थकबाकी मिळून दिली. त्याच धरतीवर आपण वनविभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे जाफरी यांनी आश्वासन दिले आहे. याबाबत लवकरच वनविभागातील रेखाचित्र कर्मचाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 6 =