You are currently viewing अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 13 मार्च पर्यंत अर्ज सादर करा

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 13 मार्च पर्यंत अर्ज सादर करा

 बाल विकास प्रकल्प अधिकारी  संध्या मोरे

सिंधुदुर्गनगरी 

 सावंतवाडी तालुक्यातर्गंत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील  इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत १३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) बाल विकास प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प सावंतवाडी यांच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सावंतवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी  संध्या मोरे यांनी केले आहे.

            भरती प्रक्रीया ग्रामपंचायत कारिवडे, सावरवाड, चराठे, डिंगणे, पाडलोस, आजगाव, सरमळे, चौकूळ, इन्सुली, कुणकेरी, शेर्ले, निगुडे, बांदा, वेर्ले, आंबेगाव, माडखोल, तळवडे, निरवडे, मळगाव, आरोस, सोनुर्ली, गाळेल, वाफोली, तांबोळी, मडुरा या ग्रामपंचायत क्षेत्रातील असलेल्या अंगणवाडीतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा