You are currently viewing राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत संदीप सावंत प्रथम..

राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत संदीप सावंत प्रथम..

राज्यस्तरीय सावली प्रकाशन समूह आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा

दोडामार्ग

तळेखोल गावचे सुपुत्र कवी, साहित्यिक व जि. प. प्राथमिक शाळा सासोली हेदूस वाघमळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप सुरेश सावंत यांनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सावली प्रकाशन समूह आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यांना ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्यांनी आतापर्यंत साहीत्य क्षेत्रात अनेक कविता, बालकविता, गझल चारोळी, हायकू, अभंग व विविध वृत्तपत्रात लेख लेखन करून प्रसिद्ध मिळवलेली आहेत. विविध काव्यस्पर्धेत सहभाग घेऊन ५०० च्यावर सन्मानपत्र प्राप्त केली आहे.
या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =