You are currently viewing गवळीटेम्ब येथील पडते घर ते पाटकर बाग रस्ता दुरुस्त करा

गवळीटेम्ब येथील पडते घर ते पाटकर बाग रस्ता दुरुस्त करा

ग्राम पंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन

बांदा

बांदा शहरातील गवळीटेम्ब येथील पडते घर ते पाटकर बाग या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी येथील प्रभाग क्रमांक ३ चे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर वाडीतील १५ ग्रामस्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ता वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला आहे. नियमानुसार या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. मात्र ते न झाल्याने रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. याठिकाणी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना देखील त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. यावेळी त्यांच्यासोबत येथील ग्रामस्थ गुरुदत्त कल्याणकर उपस्थित होते. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी ग्रामस्थ्यांच्या मागणीचा विचार करून पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा