पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना केले हॅट्स ऑफ…

पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना केले हॅट्स ऑफ…

 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार कोरोनाच्या परिस्थितीत आणि परतीच्या पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या कामाबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कौतुक केले होते. तसेच त्यांना Hats Off केले आहे. याबाबत आमदार रोहित पवारांनी त्यांचे आभार मानले आहेत.

 

Hats Off इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे, असे म्हणत शरद पवार यांचे कौतुक केले होते. पुण्यात मंगळवारी राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. ऊसतोड कामगारांचा प्रश्न सुटल्यानंतर समाधानही त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला आहे.

 

त्यांच्या या ट्विटवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दर्शविली आहे.  या प्रतिक्रियेत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या ट्विटचा धागा पकडत विरोधकांना सणसणीत टोला हाणला आहे. रोहित हे ट्विट करताना म्हणाले की, “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती ही फक्त महाराष्ट्रात दिसते. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा”.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा