You are currently viewing कणकवली नगरपंचायतच्या वतीने गांधी जयंती साजरी…

कणकवली नगरपंचायतच्या वतीने गांधी जयंती साजरी…

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगरपंचयातीच्या कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे हस्ते सन्मान

कणकवली

कणकवली नगरपंचायत वतीने 2/10/2021 रोजी सकाळी 11 वाजता नगरपंचायतीच्या परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृह येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव या सदरा खाली सफाई मित्र, स्वयंसहायता महिला बचत गट यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमात कणकवली शहरातील सर्व महिला बचत गट व नगरपंचयातीच्या आरोग्य विभाग , पाणी विभाग, विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना मा. नगराध्यक्ष श्री .समीर नलावडे व मा.श्री.उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
मागील आठवडा भर कणकवली नगरपंचयातीने मा.मुख्याधिकारी श्री. अवधूत तावडे व मा.आरोग्य सभापती श्री.अभिजीत मुसळे यांचा मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कचरा वर्गीकरण बाबतीत अपार्टमेंट मधील नागरिकांना मार्गदर्शन करणे,सफाई कर्मचाऱ्यांची कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा