You are currently viewing नागपूर जंक्शन ते मडगाव रेल्वेला १ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ

नागपूर जंक्शन ते मडगाव रेल्वेला १ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग :

नागपुर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला नॉन मान्सून १ मार्च २०२३ ते ८ जुन २०२३ व मान्सून १० जुन २०२३ ते १ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खान्देश, विदर्भ ते कोकण व गोवा अशी चालणारी ही गाडी १ जुलै २०२३ पर्यंत चालवली जाणार आहे.

खान्देश, विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती. होळी, गुढीपाडवा पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जंक्शन ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता १ जुलै पर्यंत चालवली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जंक्शन ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपुर जं येथून दर बुधवार, शनिवारी दु.०३.०६ वाजता सुटून गुरुवार, रविवारी मडगाव गोवा दुसऱ्या दिवशी सायं ०५.४६ वाजता पोहोचेल. मडगाव गोवा ते नागपुर जंक्शन दरम्यान धावताना हि गाडी ०११४० गुरुवार,रविवारी मडगाव गोवा येथून रा.०८.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३१ वाजता नागपुर जंक्शन येथे पोहोचेल. नागपुर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जंक्शन, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जंक्शन, अकोला जंक्शन, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण जंक्शन, पनवेल जंक्शन, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेच्या दोन्ही बाजुच्या मिळुन ७२ फेऱ्या होणार आहेत. या रेल्वे सेवेचे संगणकीय आरक्षण www.enquiry.indianrail.gov.in, www.irctc.gov.in व NTES ॲपवर भारतीय रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर सुरू करण्यात येईल.

नागपूर जंक्शन मडगाव एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल, कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती शेगांव सल्लागार व सदस्य ॲड.श्री.पुरुषोत्तम डांगरा, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.शबनम शेख, राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार उमाजी माळगांवकर, संपर्कप्रमुख हर्षद भगत, कुडाळ व ठाणे तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, विदर्भ – खान्देश विद्यापीठ – कॉलेजातील विद्यार्थी – विद्यार्थीनी, प्रवासी वर्गाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा