महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री यांची भेट घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन
सिंधुदुर्गनगरी
१९ आक्टोबरपासून नऊ दिवस सुरू असलेल्या घंटानाद आंदोलनाला मालवण तालुका कॉंग्रेस पक्षाचे नेते चेतन उर्फ अरविंद मोंडकर यांनी भेट देत लवकरच महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री यांची भेट घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
गेले नऊ दिवस जिल्हा मुख्यालय येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष रावजी यादव यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला चेतन मोंडकर यांनी भेट देऊन आंदोलनामागील पार्श्वभूमी जाणून घेतली.
नाविन्यपूर्ण योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती, नवबौद्ध वस्त्यांमध्ये एकही योजना राबवली नाही, हाफकिन संस्थेला एक कोटी रुपये देऊन दोन वर्षे होत आली तरी जिल्हा रुग्णालयाला आरोग्यविषयक मशिन, नेब्युलायझर, हिमोग्लोबिन मीटर उपकरणे आजपर्यंत प्राप्त झाली नाहीत. सर्वसाधारण गटाच्या नावाखाली १६ कोटी रुपये शासनाचे सर्व जीआर पायदळी तुडवून कोटींचा भ्रष्टाचार केला.
आरोंदा सहकारी सोसायटीने मयत लाभार्थ्यांच्या नावावरती रेशनिंग धान्य घोटाळा केला असल्याची माहिती रावजी यादव यांनी दिली असून मोंडकर यांनी आपण या विषयात प्राधान्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या कॉंग्रेसच्या नेत्यांशी भेट घडवून हा विषय सोडवू, असे सांगितले असल्याची माहिती आंदोलनकर्ते रावजी यादव यांनी दिली आहे.