You are currently viewing कणकवलीत ग्रा.पं. निवडणूकीसाठी पहिल्या दिवशी दोन अर्ज दाखल

कणकवलीत ग्रा.पं. निवडणूकीसाठी पहिल्या दिवशी दोन अर्ज दाखल

कणकवली

कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे.या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ प्रभाग क्रमांक ६ मधून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी प्रशांत भालचंद्र वनसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कणकवली तालुक्यात त्यांचा पहिला अर्ज दाखल झाला आहे.तसेच शिवडाव येथील प्रभाग २ मधून सर्वसाधारण जागेसाठी मारुती मनोहर म्हाडेश्वर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा