You are currently viewing सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉ. चंद्रकांत जेवरे यांचे निधन…

सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉ. चंद्रकांत जेवरे यांचे निधन…

सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉ. चंद्रकांत जेवरे यांचे निधन…

सावंतवाडी

गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत जेवरे यांचे  काल रात्री  साडे दहा वाजता माजगाव पंचम नगर मधील निवासस्थानी निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. आज त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहे. एक रुपयापासून त्यांनी सेवा बजावली होती. सावंतवाडीत सर्जन म्हणून त्यांनी काम केले होते. मूळ कर्जतचे असलेले श्री. जेवरे यांनी सावंतवाडीत कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम केले होते. त्यानंतर गोरगरिबांची सेवा करता यावी यासाठी त्यांनी शासकीय नोकरी सोडून स्वतः खाजगी सेवा देण्यास सुरुवात केली होती. त्या वेळी सावंतवाडीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी आपली चांगली ओळख केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ते देवदूत होते. सर्जन म्हणून त्यांचा हातखंडा होता. त्यांनी आपल्या अनेक वर्षांच्या काळात हजारो शस्त्रक्रिया केल्या. योग्य निदान करण्यासाठी सुद्धा ते परिचित होते. त्यामुळे अनेक डॉक्टर त्यांना आपले गुरु मानत असत. त्यांची गेले काही दिवस प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते मात्र काल रात्री 10:30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

विशेष म्हणजे सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फक्त एक मतांनी त्यांचा पराभव झाला होता. अन्यथा ते नगराध्यक्ष झाले असते. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे त्यांनी संचालक म्हणून गेली अनेक वर्ष काम केले. या काळात महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांसाठी ते आदराचे स्थान होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा