You are currently viewing माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते विशाल परब यांनी काढलेल्या गणपती विशेष कॅलेंडरचे प्रकाशन..

माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते विशाल परब यांनी काढलेल्या गणपती विशेष कॅलेंडरचे प्रकाशन..

गणेश चतुर्थी निमित्ताने भाजपचे युवा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक विशाल परब यांनी काढलेल्या कॅलेंडरचे भव्य दिव्य प्रकाशन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात गणेशच्या चरणी हे कॅलेंडर अर्पण केल्यानंतर निलेश राणे यांनी त्याचे प्रकाशन केले.

यावेळी निलेश राणे यांनी “विशाल माझा सच्चा कार्यकर्ता आहे. आमच्या राणे फॅमिली मधील एक मेंबर म्हणजे विशाल परब आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत माझ्या प्रत्येक सुख दुःख आणि संकटात विशाल परब माझ्या सोबत असतो. जसं राणे परिवार कुठलाही कार्यक्रम भव्यदिव्य करतात. तसं विशाल परब हेसुद्धा प्रत्येक कार्यक्रम भव्यदिव्य करत असतात.” अशा पद्धतीने विशाल परब यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत परब यांच्या कार्याचे कौतुक केले.

या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमास कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे,जिल्हा कार्यकारणीचे राजू राऊळ, आनंद शिरवलकर, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी सभापती प्रितेश राऊळ, ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, शहर अध्यक्ष राकेश कांदे, राजेश पडते, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, रूपेश कानडे, पप्प्या तवटे, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, चंदन कांबळी, स्वरूप वाळके, तन्मय वालावकर, निलेश परब, प्रितेश गुरव, दत्ता कोरगावकर, दिनेश शिंदे, चेतन धुरी, सौ.ममना चेतन धुरी, प्रसन्ना गंगावणे, राजवीर पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाशन झाल्यानंतर हे कॅलेंडर प्रत्येकाला वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा