You are currently viewing वैभववाडी  येथील अर्जुन रावराणे विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

वैभववाडी  येथील अर्जुन रावराणे विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

नूतन नगरसेवक रोहन रावराणे यांनी केले ध्वजारोहण 

संस्थेच्या वतीने सर्व नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार

वैभववाडी

येथील अर्जुन रावराणे विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाभवे- वैभववाडीचे नुतन नगरसेवक श्री. रोहन जयेंद्र रावराणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले.

अर्जुन रावराणे विद्यालय, कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिस स्कूल वैभववाडी येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अधिक्षक श्री. जयेंद्र रावराणे, नवनिर्वाचित नगरसेवक, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विदयार्थी व पालक उपस्थित होते.

ध्वजारोहणा नंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा संस्थेत अधिक्षक श्री. जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगरसेवक श्री. संजय सावंत, श्री. रोहन रावराणे, श्री. विवेक रावराणे, श्री. राजन तांबे, नगरसेविका सौ. यामिनी दळवी, श्रीम. सुंदराबाई निकम, कुमारी, नेहा माईणकर, सौ. संगिता चव्हाण, सौ. रेवा बावदाने, सौ. सुप्रिया तांबे, सौ. सानिका रावराणे व श्रध्दा रावराणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =