सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेला संलग्न सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना स्थापन करण्यात आली आहे. विजेचे सध्याचे दर, वीज दरवाढ, महाराष्ट्रातील व इतर राज्याच्या विज दरामधील तफावत या विषयांना अनुसरून संघटनेच्या पुढील कार्याची रुपरेषा ठरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची सभा मंगळवार दिनांक 21/02/2023 रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत मराठा हॉल, युनियन बँक शेजारी, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे..
या सभेत महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिनांक 28/2/23 रोजी अन्यायकारक वीज दरवाढ आदेशाची होळी करणे, कार्यकारिणीचा विस्तार करणे, तालुका शाखा कार्यकारिणी तयार करणे, प्रत्येक MSEB उपविभागनिहाय ग्राहकांच्या तक्रारींचे संकलन करणे, प्रकाशगड कार्यालय, मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करणे यासारख्या अनेक विषयांवर ठोस भूमिका घेण्यात येणार आहे..
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पीडित नागरिकांनी तसेच सर्व जबाबदार पदाधिकारी व सदस्यांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन *श्री. संतोष काकडे, अध्यक्ष* व *श्री. निखिल नाईक, सचिव* – सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.