You are currently viewing ‘ती’, ‘ते’, आणि ‘तो’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी….माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने पुरुषप्रधान व्यवस्था संपेल… पुरुष सक्षमीकरण होणे गरजेचे :- गिताली वि. म.

‘ती’, ‘ते’, आणि ‘तो’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी….माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने पुरुषप्रधान व्यवस्था संपेल… पुरुष सक्षमीकरण होणे गरजेचे :- गिताली वि. म.

*’ती’, ‘ते’, आणि ‘तो’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी….माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने पुरुषप्रधान व्यवस्था संपेल… पुरुष सक्षमीकरण होणे गरजेचे :- गिताली वि. म.*

सावंतवाडी

स्त्री-पुरुष विषमता नष्ट होऊन स्त्री आणि पुरुष समानता विरुद्ध लढण्यासाठी जी पुरुषप्रधान व्यवस्था आहे या व्यवस्थेविरुद्ध स्त्री आणि पुरुष यांनी एकत्र लढायला हवे. स्त्री आणि पुरुषाने मैत्री भावनेने नवपुरुष भान जागवायला हवे’ खरंतर ‘ती’, ‘ते’, आणि ‘तो’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी … माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने पुरुषप्रधान व्यवस्था संपेल. पुरुष सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. असे मत विचारवंत सामाजिक कार्यकर्त्या लेखिका श्रीमती गीताली वि .म. यांनी सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर मध्ये व्यक्त केले. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा, .शिक्षक वाड्मय चर्चा मंडळ व मिळून साऱ्याजणी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील निवृत्त प्राध्यापिका लेखिका यांनी नवपुरुष भान जागवताना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर श्रीराम वाचन मंदिरचे तथा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे जेष्ठ मार्गदर्शक जी ए बुवा, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष श्री.संतोष सावंत, लेखिका उषा परब, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर मिळून साऱ्याजणीच्या सदस्या, श्वेतल परब आधी उपस्थित होते.
श्रीमती गीताली वि .म. पुढे म्हणाल्या आज काळ बदलतो आहे. पुरुषप्रधान व्यवस्था आहे, पुरुषांशी भांडण नाही .परंतु पुरुषप्रधान व्यवस्था जी आहेत त्या विरोधात भांडण आहे. आज पुरुषांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे .जेव्हा खऱ्या अर्थाने नवपुरुष भान जागवताना स्त्री आणि पुरुष समानता यायला हवी आणि यासाठी आता जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेविरुद्ध दोघांनी एकत्र लढायला हवे. स्त्री आणि पुरुष यांचे प्रश्न समस्या एकच आहे. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. स्त्रियांनी आत्मभान, स्वावलंबी, सबळता, सक्षमीकरण होणे गरजेचे आहे .आज स्त्री सक्षमीकरणावर बोलले जाते पण खऱ्या अर्थाने आज नवापुरुष भान जागवताना पुरुष सक्षमीकरण होणे गरजेचे आहे.  स्त्रीने स्त्रीकडे बघताना मैत्रीपूर्ण भावनेने बघायला हवे. स्त्री आणि पुरुष या दोघांनी माणूस म्हणून कसे जगता येईल. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.. स्त्रीच्या समस्या आणि ज्या व्यवस्थेतून ती जात आहे तिच्यावरील ताण-तणाव अन तिचे अनेक प्रश्न तिच्यासमोर उद्भवले आहेत. ते पाहता पुरुषप्रधान व्यवस्थे विरोधात ती पेटून उठेल आणि पुरुषांनाही मारायला ती मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे पुरुषप्रधान व्यवस्थेने आता सावध व्हायला हवे. असे त्या म्हणाल्या. यावेळी प्रश्नोत्तरा हे झाले.
यावेळी श्रीराम वाचन मंदिरचे जी ए बुवा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष संतोष सावंत लेखिका उषा परब यांनी नवपुरुष भान जागवताना खऱ्या अर्थाने दोघांनी आता एकत्र यायला हवे आणि आताची पिढी कशी एकत्र येत आहे, निश्चितपणे पुढील काळ हा स्त्री पुरुष समानतेचा असेल असे स्पष्ट केले. वंदना करंबळेकर यांनी परिचय करून दिला. श्रीमती हर्षवर्धिनी सरदार, श्रीमती मूर्ती कासार, सौ.रूपाली सामंत यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रज्ञा मातोंडकर, मंगल जोशी नाईक, रामदास पारकर, प्रवीण परब, सौ परब, रूपाली सामंत तेजस्विता वेंगुर्लेकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + seventeen =