You are currently viewing कुडाळात मुलराज हिरो येथे हाय-टेक ११० सीसी स्कूटर (xoom) लाँच

कुडाळात मुलराज हिरो येथे हाय-टेक ११० सीसी स्कूटर (xoom) लाँच

कुडाळ :

 

वॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी हिरो मोटोकॉर्पकडून हाय-टेक ११० सीसी स्कूटर (xoom) लाँच करण्यात आली आहे. हि स्कुटर कुडाळ येथील मुलराज हिरो येथे दाखल झाली असून या स्कुटरचे श्री. प्रभाकर जोशी यांच्या हस्ते लाँचिंग झाले.

यावेळी श्री. अमेय जोशी यांनी पहीले ग्राहक होण्याचा मान मिळवला. यावेळी उद्योजक श्री बाबु शेट्टी श्री संजय वैद्य.
श्रीराम फायनान्सचे श्री मनोज सावंंत. एचडीएफसीचे श्री मनोज. साई पॉइंट चे श्री पेडणेकर, मुलराज हिरोचे मालक श्री भाटिया व सर्व स्टाफ तसेच एआरडी बबलु पिंगुळकर, प्रथमेश सुकी उपस्थित होते.

दैनंदिन प्रवासात साहस व उत्साह शोधणाऱ्या ग्राहकांच्या पिढीला आकर्षित करण्यासाठी बारकाईने डिझाइन आणि विकसित केलेली झूम स्कूटर समकालीन डिझाइन, उत्कृष्ट मॅन्युव्हरेबिलिटी, अतुलनीय गतीशीलता आणि असाधारण कार्यक्षमता देते. हिरो झुम मध्ये ११० सीसी श्रेणीमधील नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे. इंडस्ट्री-फर्स्ट वैशिष्ट्य – हिरो इंटलिजण्ट कॉर्नरिंग लाइट (एचआयसीएल) आणि सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये-अधिक मोठे व अधिक रूंद टायर्स, ११० सीसी विभागातील गतीशील अॅक्सेलरेशन यासह ही स्कूटर मालकांना अद्वितीय गतीशीलता अनुभवाची खात्री देते. हिरो इंटेलिजण्ट कॉर्नरिंग लाइट TM (एचआयसीएल) हिरो झूमसह ११० सीसी विभागात पदार्पण करत आहे, ज्यामधून ग्राहकांना सुधारित सुरक्षितता मिळेल.

एचआयसीएल राइडर वळण घेत असताना किंवा वक्राकार रस्त्यांकडे राइड करत असताना रस्त्यावरील अंधारमय कोपऱ्यांवर अव्दितीय प्रखर, सुस्पष्ट प्रकाश देते. राइडर्सना रस्त्यावरील कोपरे सुस्पष्टपणे दिसल्यामुळे फायदा मिळतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षित राइडिंगची खात्री मिळते.

झुम मध्ये शक्तिशाली बीएस-६ प्रमाणित इंजिन आहे, ज्यामध्ये हिरो मोटोकॉर्पचे क्रांतिकारी आय३एस तंत्रज्ञान (इंडल स्टॉप–स्टार्ट सिस्टिम) आहे. नवीन डिजिटल स्पीडोमीटरसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि साइड- स्टॅन्ड इंजिन-कट-ऑफ स्कुटरच्या टेक प्रोफाइल मध्ये अधिक भर करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा