You are currently viewing माजगाव येथे बांधकाम कार्यकारी अभियंताच्या निवासस्थानासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

माजगाव येथे बांधकाम कार्यकारी अभियंताच्या निवासस्थानासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सावंतवाडी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्या माजगाव येथील खाजगी निवासस्थानासमोर माहिती अधिकार कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. सुमेध गावडे (रा. कोलगाव) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार करत असताना सावंतवाडी पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोलगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता श्री. गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही माहिती मागितली होती. परंतु ती देण्यास संबंधित विभागाकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे माहिती न दिल्यास आपण आत्मदहन करण्याचा इशारा श्री. गावडे यांनी पोलिसांसह बांधकाम विभागाला दिला होता. दरम्यान आज साडेबारा वाजण्याच्या सुमारास गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत चव्हाण यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. तत्पूर्वी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती. यावेळी त्याने आपल्या ताब्यात असलेल्या कॅनमधील रॉकेल सदृश्य पदार्थ अंगावर ओतून घेतला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे श्री. मेंगडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा