You are currently viewing सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून नवउद्योजकांना अनेक संधी उपलब्ध – नारायण राणे

सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून नवउद्योजकांना अनेक संधी उपलब्ध – नारायण राणे

सिंधुदुर्गातील तरूणांनी उद्योजक बनून अर्थव्यवस्था सुधारावी…

मालवण

नोकरी करताना अनेक मर्यादा येतात. तुमचे उत्पन्नही मर्यादीत राहते. परंतु उद्योग हा तुमचे उत्पन्न वाढविणारा पर्याय आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून नवउद्योजकांना अनेक संधी निर्माण करून देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्गातील तरूणांनी या संधीचा लाभ घेताना उद्योजक बनावे व भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यात योगदान द्यावे असे प्रतिपादन केंद्रिय सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाचे मंत्री नारायण राणे यांनी येथे केले.

येथील शासकीय तंत्रनिकेतन आणि माजी विद्यार्थी संघ आयोजित कृतज्ञता स्नेहमेळावा २०२३ अंतर्गत माजी विद्यार्थी संघ सभासद नोंदणी अभियान शुभारंभ शासकीय तंत्रनिकेतन येथे केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, देवदत्त सामंत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव ललित वंजारे, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, बाबा परब, उत्तम जाधव, हेमंत सावंत, अमेय बर्डे, कमलिनी प्रभु आदि उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, मी गेली ३७ वर्षे राजकारण व व्यवसायात आहे. दोन्ही क्षेत्राकडे मी सारखेच लक्ष दिले. त्यामुळेच दोन्ही क्षेत्रात मी यश मिळवू शकलो. तरूणांनी नोकरी पुरता मर्यादित विचार न करता उद्योगाकडे वळायला हवे. सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला तरूण उद्योजक घडवायचे आहेत. येत्या काही काळात इंजिनियरींग व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग जिल्ह्यात आणायचे आहेत. त्यासाठी मला नवउद्योजकांची साथ हवी आहे. उद्योगाच्याबाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर रहावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

यावेळी प्राचार्य सुरेश पाटील यांनी गेल्या तीन वर्षातील शासकीय तंत्रनिकेतच्या कामकाजाचा आढावा घेतला. तीन वर्षात शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश झाले आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी कॉलेज प्रशासन व माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी तंत्रनिकेनच्या दुरूस्तीसाठी ६ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. यापैकी काही निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =