You are currently viewing .महाशिवरात्री

.महाशिवरात्री

*जागतिक साहित्यिकाला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

*…षडाक्षरी काव्य लेखन.*

विषय… महाशिवरात्री.

महाशिवरात्री
व्रत हे पावन
ॐ नमः शिवाय
रात्री जागरण

सुवासिक पुष्पे
बकुळ मंदार
पुजा बिल्वपत्री
संतुष्ट केदार

बारा ज्योतिर्लिंग
जगी बोलबाला
चिताभस्म ताजे
रोज महाकाला

भाळी चंद्रकोर
गंगामाई शिरी
मुंड माळा गळा
स्थान हिमगिरी

निलकंठेश्वर
पाप ताप हारी
बम बम भोले
तू कल्याणकारी

शिवलीलामृत
ग्रंथ हा पुराण
महामृत्युंजय
मंत्र हा महान

जन्ममरणाचा
चुकू दे हा फेरा
दावी मार्ग मोक्ष
आस गंगाधरा…

सौ पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे.
9011659747

प्रतिक्रिया व्यक्त करा