You are currently viewing थंडी

थंडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मृणाल प्रभुणे लिखित अप्रतिम लावणी*

 

*थंडी*

 

लपेटून घेवू आता दोघात एक रजई

सोसवेना मजला आता थंडी ही बाई ..||धृ ||

 

इष्काची चूल आता पेटवा राया

उबदार करा हो सारी काया

साद घालूनी सांगते जवानी ही काई

सोसवेना मजला आता थंडी ही बाई …||१||

 

करते स्वाधीन सारा मोलाचा ऐवज

जाळ्यात आलंय तुमच्या अलगद सावज

प्रेमाच्या कारागिरीची आता दाखवा हो धिटाई

सोसवेना मजला आता थंडी ही बाई ..||२||

 

मधाचं पोवळं दिलं तुमच्याच हाती

चाखून पहावी थोडी त्यातली गोडी

लोण्यावाणी ही वितळून काया जाई

सोसवेना मजला आता थंडी ही बाई ..||३||

 

लपेटून घेवू आता दोघात एक रजई

सोसवेना मजला आता थंडी ही बाई ..||धृ ||

 

मृणाल प्रभुणे

नाशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =