You are currently viewing बंद असलेली मंदिरे सुरू करा; उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ‘मनसे’चे घंटानाद आंदोलन..

बंद असलेली मंदिरे सुरू करा; उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ‘मनसे’चे घंटानाद आंदोलन..

सावंतवाडी

बंद असलेली मंदिरे सुरू करण्याबाबत आज उपविभागीय अधिकारी महसूल तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुक्याच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘आघाडी सरकारचा निषेध असो’ ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ अशा घोषणांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच महाराष्ट्र सैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यासंदर्भात मनसे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी महसूल तथा उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की, मिशन अंतर्गत लॉक डाऊन च्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थाने भाविकांसाठी खुली करण्यात आली मात्र आपल्या महाराष्ट्रात अद्यापही मंदिर अथवा धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही.
राज्य सरकार मॉल, दारूची दुकाने उघडून शकत, बस सेवा सुरू करू शकत, जिम, ग्रंथालय सुरू करू शकत. मग मंदिर का उघडली जात नाहीत. पुजारी मंदिराच्या आजूबाजूच्या लोकांचा देव देवतांची पूजाअर्चा करणाऱ्या भाविकांचा भक्तगणांचा राज्य सरकारने विचार केला आहे का?
त्यामुळे सिंधुदुर्गातील तसेच सावंतवाडी तालुक्यातील मंदिर उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी या मागणीसाठी आम्ही सदर निवेदन तालुका मनसे तर्फे घंटानाद आंदोलन करून देत आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, कामगार सेना कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, परिवहन सेना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, माजी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, व्यत्ये शाखाध्यक्ष महादेव पेडणेकर, मनविसे उप तालुकाध्यक्ष संकेत मयेकर, आकाश परब, भास्कर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा