You are currently viewing केंद्रीयमंत्री राणेंच्या उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या कृतज्ञता स्नेहमेळावा

केंद्रीयमंत्री राणेंच्या उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या कृतज्ञता स्नेहमेळावा

मालवण

मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन माजी विदयार्थी संघाच्या वतीने उद्या शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते १.३० वा. शासकीय तंत्रनिकेतन मध्ये माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २००२ मध्ये ना. राणेनी कुंभारमाठ – देवलीच्या माळरानावर शासकीय तंत्रानिकेतनची मुहूर्तमेढ रोवली. मात्र आज या इमारतीची दुरावस्था झाली असून विद्यार्थी वर्ग अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी विद्यार्थी संघाने पुढाकार घेतला आहे. पालकत्वाच्या भूमिकेतून ना. राणेंच्या माध्यमातून शासनकर्त्यांचे येथील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा