You are currently viewing बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड..

बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड..

वेंगुर्ला :

 

कोल्हापूर येथे झालेल्या शालेय रायफल शुटिंग विभागीय स्पर्धेत बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. राजकुमारी हिंदुस्थानी संजय बगळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल तिचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे पेट्रन कौन्सिल मेंबर बाळासाहेब देसाई यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला व तिला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, माजी प्राचार्य डॉ. ए. पी. बांदेकर, पर्यवेक्षक डी. जी.शितोळे, प्रा. एम बी चौगुले सर, प्रा. डी आर आरोलकर, जिमखाना चेअरमन व्ही.पी.देसाई, क्रिडा शिक्षक हेमंत गावडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तीला क्रीडा शिक्षक हेमंत गावडे व उपरकर शुटिंग ॲकॅडमीचे कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा