You are currently viewing महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले उदघाटन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले उदघाटन

वेंगुर्ले

वेंगुर्ले कँम्प येथील टेलिफोन एक्सचेंज आँफिस जवळील मैदानावर गुरूवारी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत, माजी आमदार राजन तेली, कार्यक्रमाध्यक्ष उदय शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माजी राज्याध्यक्ष नाना जोशी, काळू बोरसे पाटील, राज्य कोषाध्यक्ष केदू देशमाने, राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र खेडकर, शिक्षक नेते शिवाजीराव साखरे, जेष्ठ नेते विवनाथ मिरजकर, सल्लागार चंद्रकांत अणावकर, राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर, राज्य सहसचिव नामदेव जामसंडेकर, कोकण विभाग प्रमुख अंकुश गोफणे, राज्य महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे, बळीराम मोरे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, वेंगुर्ले शिक्षक समितीचे नेते संतोष परब, वेंगुर्ले तालुका संघटक वासुदेव कोळंबकर, संतोष बोडके, वेंगुर्ले प्रवक्ते त्रिंबक आजगांवकर आदी उपस्थित होते.या राज्य अधिवेशनात एकच मिशन जुने पेन्शन लिहिलेल्या पांढऱ्या रंगाच्या टोप्या घालून शिक्षक उपस्थित होते .. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, माजी आमदार राजन तेली यांचे स्वागत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी तर दिपक केसरकर यांचे स्वागत शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =