You are currently viewing कणकवली बांधकरवाडी येथे शाळा नं.२ परिसरात आग

कणकवली बांधकरवाडी येथे शाळा नं.२ परिसरात आग

आग आटोक्यात आणण्यासाठी नगरसेवक अभी मुसळे व न.पं. कर्मचारी यांनी केले प्रयत्न

कणकवली

कणकवली बांधकरवाडी येथील शाळा नं २ परिसरात बुधवारी दुपारी १२.१५ वा.च्या सुमारास किरकोळ कचरा जाळण्यासाठी लावलेली आग नजीकच्या गवताला लागून भडकल्याने तेथील झाडे जळली आहेत. याबाबतची माहिती शाळा नं २ च्या शिक्षकांनी नगरसेवक अभि मुसळे यांना दिली असता त्यांनी तात्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी नेत काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या आग लागलेल्या भागाच्या आसपास शाळा व वस्ती असल्याने होणारे संभाव्य नुकसान देखील टळले. नगरपंचायत कर्मचारी रोहन डीचोलकर व इतर न.पं. कर्मचाऱ्यानी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + nine =