You are currently viewing बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे शिवसेना (उ बा ठा) च्या पदाधिकाऱ्यांनी केले लोकार्पण

बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे शिवसेना (उ बा ठा) च्या पदाधिकाऱ्यांनी केले लोकार्पण

वैद्यकीय  सोयी सुविधा सुरू होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही –  बाबुराव धुरी

दोडामार्ग

शासनाने आठवडा भरात प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी याच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा न केल्यास आपण लोकासमवेत लोकभावना लक्षात घेऊन या नूतन इमारतीचे लोकार्पण करू असा शिवसेना (उ. बा. ठाकरे) चे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी शासनाला इशारा दिला होता, तो त्यांनी आज खरा करताना तमाम शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेंच ग्रामस्थांच्या उपस्थितीत या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पाडला,तर आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधांसाठी आज पासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली, जोपर्यंत या नुतन इमारतीत सोयी सुविधा सुरू होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे बाबुराव धुरी याप्रसंगी म्हणाले.

सदरच्या आरोग्य केंद्राची इमारत बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पणास सज्ज आहे मात्र प्रशासनाचा चालढकलपणा सुरू असल्याने या कामास विलंब होत आहे, याचा त्रास या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना होत असून हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे असे जनतेचे मत होते, यासाठी अनेकवेळा मागण्या व आंदोलने झाली अखेर काल बाबुराव धुरी यांनी या इमारतीची पाहणी केली व सोयी सुविधा पूर्ण आहेत त्यामुळे लागलीच प्रशासनाने या इमारतीचे लोकार्पण करावे असे आवाहन केले मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केला अखेर आज तमाम शिवसैनिक पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला.

यावेळी बाबुराव धुरी यांसह तालुकाप्रमुख संजय गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, महिला आघाडी तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, माजी उपसभापती सुनंदा धरणे, माजी नगराध्यक्ष लीना कुबल, विभाग प्रमुख सज्जन धाऊसकर, युवासेना शहर प्रमुख ओंकार कुलकर्णी यांसह विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व साटेली भेडशी ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा