कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १६ नोव्हेंबर रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. १६ रोजी दुपारी १.०० वाजता येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पटांगणावर ही सभा होणार असून यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांचे दौरे या मतदारसंघात झाले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण असणार असल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले.
१६ रोजी आ. नितेश राणेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत
- Post published:नोव्हेंबर 14, 2024
- Post category:कणकवली / बातम्या / राजकीय / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कर्तृत्वाचा महामेरू: नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री पांडुरंग मंदिर झोळंबे येथे सालाबाद प्रमाणे माघी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
