You are currently viewing भाजपा वेंगुर्ले महीला मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

भाजपा वेंगुर्ले महीला मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

*भाजपा वेंगुर्ले महीला मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*

भारतातील पहील्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्यारया सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .
आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणारया सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस . भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचे काम केले . ज्या काळात मुलींचे शिक्षण म्हणजे अशक्य गोष्ट होती , त्या काळात ज्योतीबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी सुरुवात केली आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केली , अशा प्रकारे आदरांजली वाहण्यात आली .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर व महीला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , जिल्हा चिटणीस निलेश सामंत , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर , नगरसेवीका साक्षी पेडणेकर व ईशा मोंडकर , रसिका मठकर , आकांक्षा परब , स ई चेंदवणकर , छोटु कुबल उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा