रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय बौध्द महासभा यांच्यावतीने घंटानाद आंदोलनास सुरुवात…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय बौध्द महासभा यांच्यावतीने घंटानाद आंदोलनास सुरुवात…

सिंधुदुर्गनगरी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय बौध्द महासभा यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलनास सुरुवात झाली आहे.

विद्यमान कलेक्टर हे सीईओ असताना २७ लाख ८० हजार आणि डॉ चाकुरकर यांनी हाफकीन संस्थेला मे २०१८ ला ५१ लाख ७५ हजार रुपये उपकरणांसाठी देऊन दोन वर्षे होत आली तरी ती उपकरणे आजपर्यंत प्राप्त झाली नाहीत, म्हणून हे आंदोलन सुरू आहे.

हे आंदोलन कोण्या एका जाती धर्माच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून भारतीय संविधानाच्या आधारे डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत डॉ. आंबेडकर यांच्या नावे काढलेल्या योजना ह्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत नाहीत, या व्यतिरिक्त आरोंदा सहकारी सोसायटीने मयतांच्या नावावर अत्योंदय अन्नसुरक्षा योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा केला म्हणून त्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी हे आंदोलन तसेच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात इंटरनेट सेवा सुरू करावी यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव, जिल्हासचिव सूर्यकांत नाईक, भारतीय बौध्द महासभा जिल्हासचिव दामोदर गवई, दिलीप नाईक, अरुण नाईक, देवदत्त पडते आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा