You are currently viewing सावंतवाडी पालिकेतर्फे पाच हजार पिशव्यांचे वाटप

सावंतवाडी पालिकेतर्फे पाच हजार पिशव्यांचे वाटप

सावंतवाडी :

 

सावंतवाडी पालिकेतर्फे पाच हजार पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. इचलकरंजी येथील धनलक्ष्मी टेक फॅब या कंपनीकडून या पिशव्या खरेदी करण्यात आल्या आहेत. एका पिशवीची किंमत 41 रुपये आहेत. पाच हजार पिशव्या असून त्याची किंमत दोन लाख आहे. या पिशव्या महिला बचत गटातील महिलांना तसेच शहरातील दारिद्र रेषेखालील नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर नागरिकांनी टाळावा आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा यासाठी जनजागृती म्हणून या पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा